esakal | मद्यविक्री थंडावल्याचा असाही परिणाम, महसूलात तब्बल साडे तीन हजार कोटींची तूट
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यविक्री थंडावल्याचा असाही परिणाम, महसूलात तब्बल साडे तीन हजार कोटींची तूट

हॉटेल, रेस्टारेंट उद्योग सुरु झाल्यास मद्यविक्रीत वाढ होण्याचा अंदाज

मद्यविक्री थंडावल्याचा असाही परिणाम, महसूलात तब्बल साडे तीन हजार कोटींची तूट

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : लॉकडाऊनमुळे मद्यविक्री व्यवसायाला लागलेले ग्रहण अजूनही सुटले नाही. त्याचा थेट परिमाण मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूलावर झाला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात उत्पादन शुल्काच्या माध्यमातून केवळ 3,384 कोटी रुपयाचा महसूल मिळाला आहे. लॉकडाऊनपासून परमीट रेस्टारेंट, बार बंद आहेत. त्यामुळे मद्यविक्री थंडावल्याने सरकारच्या तिजोरीला  साडेतीन हजार कोटीचा फटका बसला आहे.

राज्य सरकारने मद्यविक्रीवरील विवीध कराच्या माध्यमातून चालू वित्त वर्षात 19,245 कोटी रुपयाचे उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले होते. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. अपेक्षीत उत्पन्नाचे टार्गेट गाठण्यासाठी या चार महिन्यात सरकारी तिजोरीत किमान 6,415 कोटी रुपये जमा व्हायला हवे होते. 

मोठी बातमी : तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

राज्यात मद्य दुकान अजूनही पुर्णपणे उघडली नाही, हॉटेल रेस्टारेंट व्यवसाय अजूनही उघडलेला नाही. कोरोनाच्या भितीमुळे अनेकांनी थंड बिअर पीणे बंद केले आहे. त्यामुळे मद्यव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने, महसूली उत्पन्न घटले असल्याचे उत्पादन शुक्ल आयुक्त कांतीलाल  उमप यांनी म्हटले आहे. मात्र सरकार उत्पन्नाचे लक्ष्य़ गाठण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपायोजनावर काम करत असल्याचेही उमप यांनी म्हटले आहे. 

राज्याच्या उत्पन्नात मद्यविक्रीचा महत्वाचा वाटा आहे. गेल्या वर्षी सरकारने उत्पादन शुक्लच्या माध्यमातून 15,434 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवल होतं. त्यामुळे लॉकडाऊन काळातही 4 मे रोजी मद्यविक्रीचे दुकाणे उघडी करण्यास सरकारने परवानगी दिली होती. मात्र वाईन शॉपपुढील गर्दी बघता राज्य सरकारने घरपोच सेवा देण्याचा निर्णय केला होता. 

मोठी बातमी :  इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी...

मात्र गेल्या 5 महिन्यापासून  हॉटेल, रेस्टारेंट उद्योगास उघडण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे  या ठिकाणी होणाऱ्या मद्यविक्रीवर परिणाम तर झाला मात्र रेस्टारेंट, हॉटेल व्यवसायाची कंबर मोडली आहे. या काळात परप्रांतीय कामगारही आपल्या आपल्या राज्यात निघून गेल्याने मद्यविक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. राज्यात 15 हजार रेस्टारेंटमध्ये मद्यसेवा देण्यात येते, तर 1685 वाईन शॉप्स, 5000 बिअर शॉप तर 4045  देशी दारुचे बार, दुकाणे आहेत. त्यामुळे जर रेस्टारेंट, हॉटेल व्यवसाय सुरु झाला तर मद्यविक्रीचे प्रमाण वाढू शकते.अस आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

liquor sale directly affected revenue deficit of three thousand crore in maharashtra

loading image
go to top