
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी मुंबई आणि उपनगरांमधून हजारो नागरिकांनी चैत्यभूमी आणि हिंदू कॉलनीतील राजगृह येथे येऊन अभिवादन केले. मात्र यावेळी रविवारीचे वेळापत्रकानुसार लोकल चालवली. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.