

Mumbai Local Train
ESakal
मुंबई : मुंबई लोकलमध्ये नेहमीच प्रवाशांमध्ये वाद, हाणामारी होत असल्याचे प्रकार समोर येतात. इतकेच नव्हे तर गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी एकमेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडले आहेत. लोकलमधील अशा प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. ज्यामध्ये पुरुषांच्या डब्यात पुरुष प्रवाशाने एका महिलेला मारहाण केल्याची माहिती आहे.