esakal | Lockdown Effect Maharashtra suffer 7.5 thousand crores loss Uddhav Thackeray

बोलून बातमी शोधा

Lockdown

Lockdown Effect: महाराष्ट्राला बसणार इतक्या हजार कोटींचा फटका

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असताना लसतुटवडा निर्माण झाला. तशातच दररोज राज्यात ५०हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागणार की नाही? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. पण महाराष्ट्रात जर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन झाला, तर कररुपाने मिळणाऱ्या साडेसात हजार कोटी रुपयांच्या महसुलावर राज्य सरकारला पाणी सोडावे लागेल आणि त्यामुळे लॉकडाउनचा फार मोठा आर्थिक फटका महाराष्ट्राला बसू शकतो, अशी भीती ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (AIAI) ने व्यक्त केली.

दिलासादायक! चाचण्या पॉझिटिव्ह येण्याच्या दरात घट

लॉकडाऊन झाल्यास राज्य सरकारप्रमाणे केंद्रालाही महाराष्ट्रातून पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार नाही, अशीही शक्यता AIAIचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी व्यक्त केली आहे. पंधरवड्याच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे 17 हजार 817 कोटी रुपयांचे औद्योगिक उत्पादन बुडेल", अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. देशातील निर्यातीपैंकी वीस टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. त्यामुळे या कालावधीत 18 हजार 900 कोटी रुपयांची निर्यात होणार नाही. केंद्राकडे जमा होणाऱ्या थेट करांपैकी 32 टक्के रक्कम मुंबईतून जमा होते. ही रक्कम वार्षिक साडेतीन लाखकोटी रुपये असते. महाराष्ट्रातील सर्व MIDC संकुलांमध्ये 51 हजार उद्योगधंदे आहेत. त्यांच्यामार्फत सुमारे साडेपंधरा लाख लोकांना रोजगार मिळतो. लॉकडाऊनमुळे राज्यातील गुंतवणूक, नोकऱ्या व उत्पादन यांच्यावर मोठा परिणाम होईल, असेही कलंत्री यांनी स्पष्ट केलं.

सत्ताबदलाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

दरम्यान, गेले काही दिवस राज्यात लॉकडाउन लागणार असं सांगितलं जातंय. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी लॉकडाउनच्या मुद्द्यावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान लॉकडाउनशिवाय कोरोना साखळ तुटणार नाही असा सूर मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री आणि राज्यातील काही अधिकारी वर्गामध्ये दिसून आला. राज्यात लॉकडाउन लावायचा असेल तर जनतेला त्याआधी दोन-तीन दिवस कल्पना द्यावी असेही मत काही नेत्यांनी मांडले. तर हातावर पोट असणारे मजूर, छोटे व्यापारी आणि इतर कामगार वर्गासाठी पॅकेजची घोषणा करावी आणि मगच लॉकडाउन लावावं असं मत भाजपकडून मांडण्यात आले. या साऱ्या मुद्द्यांना एकत्रित करून सुवर्णमध्य काढण्यात येईल आणि लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.