Lockdown : अंध व्यक्तीचे गृहस्वप्न पूर्ण होणार? न्यायालयाचा दिलासा

home
home

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना नवी मुंबईतील एका अंध व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सिडकोच्या सोडतीत लागलेल्या सदनिकेची रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत न्यायालयाने मंजूर केली. त्यामुळे त्याचे स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होण्याची आशा निर्माण झाली आहे.

नवी मुंबई परिसरातील खारघर येथील सिडको वसाहतीमधील सदनिका याचिकादार अंध नागरिकाला मिळाली आहे. या सदनिकेसाठी सुमारे सात लाख रुपये 8 मेपर्यंत जमा करणे बंधनकारक होते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत पैशाची जमवाजमव करणे शक्य झाले नाही; त्यामुळे पैसे भरण्यासाठी मुदत द्या, अशी मागणी याचिकादाराने अॅड्. नितेश भुतेकर यांच्या मार्फत केली होती. 

या याचिकेवर न्या. सुरेश गुप्ते यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. सिडकोच्या वतीने अॅड्. रोहित सखदेव यांनी याचिकेला विरोध केला. सध्याच्या अनपेक्षित परिस्थितीचा विचार करून मुदतीत पैसे जमा करणे जिकिरीचे आहे. त्यामुळे याचिकादाराला जूनच्या अखेरपर्यंतची मुदत न्यायालयाने मंजूर केली. रक्कम जमा करण्यासाठी ही अंतिम मुदत असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

दोन वर्षांपूर्वीही आदेश
याचिकादाराला या 600 चौरस फुटांच्या सदनिकेची रक्कम भरण्यासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये विलंब झाला होता. त्यावेळी सिडकोने त्यांची सदनिका रद्द केली होती. तेव्हा अन्य खंडपीठाने सिडकोने मानवीय दृष्टिकोन ठेवून जागा द्यावी, असा आदेश दिला होता.

Lockdown: Will the blind man's dream come true? Court relief

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com