मुंबईचा ‘चहा’ सर्वाधिक महाग; उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी विविध वस्तूंचे दर निश्‍चित

राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोर धरू लागला आहे. जसजसे उमेदवार जाहीर होतील, तसतसे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी विविध वस्तूंचे दर निश्‍चित करण्यास सुरुवात केली आहे.
lok sabha election expense most expensive tea in mumbai
lok sabha election expense most expensive tea in mumbaiSakal

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोर धरू लागला आहे. जसजसे उमेदवार जाहीर होतील, तसतसे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी विविध वस्तूंचे दर निश्‍चित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत निश्‍चित केलेल्या दरात मुंबईतील दर सर्वाधिक आहेत. येथे चहासाठी सर्वाधिक दर आहे.

मुंबईतील उमेदवारांना चहाच्या एका कपसाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई उपनगरात हाच दर १० रुपये, कोल्हापुरात एका चहाच्या कपसाठी ७ व साताऱ्यात ८ रुपये मोजावे लागणार आहेत.

आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ९५ लाख इतकी खर्च मर्यादा निश्‍चित केलेली आहे. मुंबई शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे दर निश्‍चित केले आहेत. तर राज्यात ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांवर दर निश्चिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांनी साधारण ८० वस्तूपासून ते २५० वस्तू पर्यंतचे दर निश्चिती केली आहे. चहा नाश्त्यापासून जेसीबीपर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

साताऱ्यात शाकाहारी जेवण ७० रुपयांत

सातारा जिल्ह्यात खाद्यपदार्थांचे दर (रुपयांत) : चहाचा कप आठ रुपये, कॉफी दहा रुपये, पाण्याची बाटली १७, शीतपेय २०, वडापाव १०, सामोसा १५, पोहे १५, शिरा १०, उपमा १५, मिसळ ४०, इडली २५, डोसा-उत्तप्पा १५, मिसळ-पावभाजी ६०, साधे शाकाहारी जेवण ७० रुपये दर निश्‍चित केले आहे.

मांसाहारी थाळीचे वेगवेगळे दर

सातारा जिल्ह्यात मांसाहारी थाळीसाठी १२० तर कोल्हापुरात हा दर १४० करण्यात आला आहे. मुंबईत मांसाहारी थाळीचा दर तब्बल २०० रुपये करण्यात आला आहे. मुंबई उपनगर येथे हाच दर कोल्हापूर एवढा म्हणजे १४० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे.

वाहनांसाठीचे भाडे निश्‍चिती

सातारा येथे दुचाकी , रिक्षा, जीप पासून ते प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनापर्यंत एक दिवसासाठी साधारण ६०० रुपये ते १५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. तर पाण्याचे टॅंकर ६०० ते ११०० रुपये, जेसीबी ९०० रुपये प्रतितास असा दर निश्चित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हाच दर ११०० ते १५ हजार रुपये इतका निश्चित केला आहे.

मुंबईत साहित्याचे दर सर्वाधिक

मंडप फर्निचर वीज साहित्यासह व्यासपीठ प्रतिचौरस फूट ७, मंडप प्रतिचौरस फूट १०, बॅरिकेट्स (बांबू-रनिंग फूट) ३०, प्रतिखुर्ची सहा रुपये, व्हीआयपी खुर्ची ८०, लाकडी टेबल ४० रुपये, लोखंडी टेबल ५० रुपये,

व्हीआयपी टीपॉय २५०, जनरेटर तीन हजार ते दहा हजार, फटाके यांचे ग्रामीण भागासाठी दर जवळपास सारखेच आहेत. तर राज्यात मुंबईचे सर्वच साहित्याचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरचा ताळेबंद सादर करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.

आयोगाची नजर

निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवाराकडून स्टार प्रचारकांचा वापर केला जातो. अभिनेते आणि अभिनेत्रींना प्रचारासाठी बोलावले जाते त्याच्यावरही निवडणूक आयोगाची नजर असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com