Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

Mumbai News: अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपने विद्यमान १० खासदारांची तिकिटे कापल्याचे स्पष्ट झाले आहे. यातले बहुतेक खासदार नव्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले असले, तरी उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन आज नवीन उमेदवार उज्ज्वल निकम यांचा अर्ज भरण्यास हजर नव्हत्या. पूनम महाजन यांचे वडील प्रमोद महाजन हे महाराष्ट्रात भाजपचे आधारस्तंभ होते.

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट
Mumbai News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत यांची जामीनाची मागणी

उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी, ‘भाजपचे आभार मानत मतदारसंघाने आपल्यावर मुलीसारखे प्रेम केले, देशाच्या सेवेसाठी आपण सदैव तयार आहोत,’ असे लिहिले होते. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी, आपले पूनमशी व्यक्तिगत संबंध आहेत, त्यांना आपण भेटू, असे स्पष्ट केले होते.

मात्र अद्याप मनोमीलन झाले नसल्याचे दिसते आहे. निकम यांनी आज विलेपार्ल्याचे आमदार पराग अळवणी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी आयोजित पदयात्रेला हजेरी लावली. काल रात्री उशिरा पालघर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर १० उमेदवार बदलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंद्र गावित यांच्याऐवजी हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली.

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट
Mumbai News: पाकिस्तानात अडकलेल्या ‘त्या’ खलाशावर अखेर मुंबईमध्ये झाले अंत्यसंस्कार

यापूर्वी मनोज कोटक, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी अशा मुंबईतील तिन्ही खासदारांना भाजपने संधी नाकारली होती. प्रीतम मुंडे (बीड) यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा यांना संधी देण्यात आली आहे. जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), उन्मेष पाटील (जळगाव) यांना संधी नाकारण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने (रामटेक), भावना गवळी (वाशीम यवतमाळ), हेमंत पाटील (हिंगोली) यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक प्रचारात सक्रिय झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com