Lok Sabha Election: भाजपच्या दाव्यानं रायगडमधील राजकारण ढवळलं, तटकरेंनाच थेट आव्हान!

रायगड भाजप लोकसभेचा उमेदवार धैर्यशील पाटील हेच असणार अतुल काळसेकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष | Raigad BJP Lok Sabha candidate Dhairyashil Patil will be Atul Kalsekar BJP State Vice President
Loksabha Election
Loksabha Electionsakal

मागील पाच वर्षात रायगडचे राजकीय समीकरण बदलले असून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे 32 रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वात प्रबळ पार्टी म्हणून प्रस्थापित झाली आहे

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असेल. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा, जनतेच्या समस्यांसाठी लढणारा, संघर्ष करणारा नेता धैर्यशील पाटील हे लोकसभेचे भावी उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित असल्याची घोषणा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बुधवारी (ता.7) सायंकाळी पालीत ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.

Loksabha Election
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

यावेळी जमलेला जनदायसमूह आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करीत माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकरिता रायगड लोकसभेच्या उमेदवाराची मागणी केली.

या कार्यक्रमाला संबोधित करतांना भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, मी एक वर्षापूर्वी या भाजप सरकारमध्ये पक्षप्रवेश केल्याने येथील राजकीय वाद हा संपुष्टात आला आहे. संपूर्ण मतदारसंघ हा भाजपमय झाला झाला आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात एकट्या भाजपची ३ लाख २० हजार मते असल्याचा दावा त्यांनी केला. रायगड जिल्ह्यासह खेड, दापोली, मंडणगड, गुहागर मध्येही राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. आणि आता हे सर्व आमदार त्यांच्या विरोधात आहेत. ए.टी.पाटील यांच्यानंतर मागील ४० वर्षात पेण तालुक्याला खासदारकी मिळाली नाही.

येत्या काळात रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई होत असून या विकासगंगेत सर्वसामान्यांना सामावून घेण्यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली आहे. उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे निवडून येऊन मोदीचे हात बळकट करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपचे आमदार रवींद्र पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा नेते बाळासाहेब पाटील, भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा, माजी जिल्हा परिषद सदस्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस गिता पारलेचा, तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : निवडणुकीसाठी बूथ स्तरावर नियोजन आवश्यक ; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

सुनील तटकरेंनी लोकसभेची उमेदवारी सोडावी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे सध्या रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे कुठेही उमेदवारी करणार नसल्याचे घोषित केले आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी न करता राज्यात लक्ष घालुन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे धैर्यशील पाटील म्हणाले. तसेच माझ्यासह सहा आमदारांनी मागील टर्ममध्ये सुनील तटकरे यांना भरभरून मदत केली म्हणून ते आज खासदार आहेत. आता या सहा आमदारांपैकी एक ही त्यांच्या बाजूने नाही परिणामी आजच्या घडीला भाजपची ताकद रायगड जिल्ह्यात मोठी आहे असे देखील धैर्यशील पाटील म्हणाले.

Loksabha Election
Loksabha Election 2024: मिथुन चक्रवर्ती विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा... पश्चिम बंगालच्या लोकसभा या जागेवर दोन स्टार्समध्ये राजकीय संघर्ष?

लोकसभेला पेण-सुधागड मतदार संघातून ८० हजार मतांची आघाडी देणार

यावेळी परिवर्तित मजकूर: खासदाररवींद्र पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना पेण मतदार संघातून ८० हजार मतांची आघाडी देण्याची घोषणा केली. तसेच विरोधी पक्षाकडे विकासाचा चेहरा नाही अशी टीका करीत विकास म्हणजे मोदी म्हणून भाजप विकासाचा चेहरा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्याकरिता मोदी सरकारने कोट्यवधी रुपये पाठवले असून हर घर जल योजनेचे काम सुरू असून गावोगावी घरोघरी पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व सामान्य नागरिकांमध्ये 32 रायगड लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा आणि ते धैर्यशील पाटील असावेत. सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे. तिचा आदर महायुतीच्या सर्व घटक पक्षाने करून धैर्यशील पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी.

राजेश मपारा, महाराष्ट्र प्रदेश सदस्य

Loksabha Election
Loksabha Election 2024: मिथुन चक्रवर्ती विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा... पश्चिम बंगालच्या लोकसभा या जागेवर दोन स्टार्समध्ये राजकीय संघर्ष?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com