esakal | बाप रे ! प्रियसीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 27 लाख हडपले
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

काही दिवसांनी याबाबत तिने विचारणा केली असता त्याने पिस्तुलाचा धाक दाखवुन मारण्याची धमकी दिली.

बाप रे ! प्रियसीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 27 लाख हडपले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खालापूर (बातमीदार) : लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीकडून 27 लाख 50 हजार 940 रूपये आणि दागिने हडप करणाऱ्या संतोष लक्ष्मण जंगम (रा.घोसाळवाडी ता.पनवेल) विरोधात प्रेयसीने तक्रार दाखल केली आहे. संतोष जंगमने त्याचे लग्न झाल्याचे देखील वर्षभर लपविले होते.

मोठी बातमी - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

खोपोलीत विरेश्वर सोसायटीत राहणाऱ्या महिलेचे आणि संतोष जंगमचे मार्च 2019 पासून प्रेमसंबध होते. संतोषने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत तिची वेळोवेळी शारिरिक पिळवणूक केली. खोपोलीत नवीन रूम घेतो असे सांगून संतोषने तिच्याकडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने तसेच पार्लरचा व्यवसाय करण्यासाठी आणलेले सामान घेतले. काही दिवसांनी याबाबत तिने विचारणा केली असता त्याने पिस्तुलाचा धाक दाखवुन मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

अखेर तिने त्याच्यानविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास  पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सतिष आस्वर करीत आहेत.

lover was lured into marriage and cheat with Rs 27 lakh