ऑनलाईन शिक्षणाचा डोळ्यांवर परिणाम; 25 रुग्णांमध्ये 7 विद्यार्थी 

dry-eyes.jpg
dry-eyes.jpg

खारघर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये, म्हणून सरकारच्या परवानगीने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचा आरोग्यवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहे. दररोज डोळ्यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या 25 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे विद्यार्थी असल्याचे नेत्र तज्ज्ञ सांगित आहेत. 


ऑनलाईन शिक्षणसाठी सतत कॉम्युटर, मोबाईल समोर बसल्याने डोकेदुखी, डोळे लालसर होणे, कोरडेपणा, डोळ्यांवर ताण, डोळे लालसर होणे तर काही विद्यार्थ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याचे खारघर, कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील डॉक्‍टरनांनी "सकाळ'ला सांगितले. ऑनलाईन शिक्षण काही महिने सुरु राहिल्यास डोळ्याच्या आजारात वाढ होण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 


मुर्बीगाव येथील फुलाजी ठाकूर यांनी सांगितले की, इयत्ता पहिला आणि पाचवीत माझी दोन मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र डोळे दुखणे, पाठ दुखणे अशा अडचणीमुळे ती शिक्षण घेण्यास कंटाळा करत आहेत. खारघर येथील नेत्र तज्ज्ञ डॉ.चंद्रज्योती शर्मा म्हणाले, ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, ऑनलाईन शिक्षण देणारे शिक्षक आणि वर्क फ्रॉम होम नुसार खाजगी कंपनीत काम करणारे कर्मचारी डोळे दुखणे, डोळे लालसर होणे, चुरचुरणे आदी क्‍लिनिकमध्ये डोळ्याच्या तक्रार घेवून रुग्ण असतात. लॉकडाऊनच्या पुर्वी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आता रुग्णांची संख्या वाढत आहे. 

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मधील ब्लू लाईटमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील पडद्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. ऑनलाईन शिक्षण घेताना वीस मिनिटे शिक्षण आणि वीस मिनिटे डोळ्याची उघडझाप करण्यासाठी विश्रांती आवश्‍यक आहे. तसेच मुलाच्या चष्माचे प्रमाण वाढत आहेत. रुग्णलयात रोज डोळ्यांचे विकार घेवून येणारे रुग्णांपैकी 25 रुग्णांपैकी 7 हे शालेय विद्यार्थी आहेत. 
- डॉ रजत जाधव, नेत्र तज्ज्ञ, कामोठे 

नियमित शाळा सुरु असताना थोडाफार टीव्ही पाहून मुले उर्वरित अभ्यास करीत असे,मात्र ऑनलाईनमुळे तीन ते चार तास मोबाईल,लॅपटॉप घेवून बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर ताण पडणे,डोळे लाल होणे अश्‍या प्रकारच्या विध्यार्थाच्या तक्रारी वाढल्या आहेत. 
- डॉ राजेश अग्रवाल, कळंबोली, नेत्र तज्ज्ञ 

ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून रुग्णालयात डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी अश्‍या समस्या विद्यार्थी वर्गात वाढल्या आहेत. 
डॉ.नितीन सितुप, नेत्र तज्ज्ञ, पनवेल. 

कोट... 
शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुले कंटाळा करतात. 
- छाया छेडा, मुख्याध्यापिका, केपीसी शाळा, खारघर  

 

 lowdown time increase eye patients due online education in navi mumbai

(संपदान ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com