
कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे.
मुंबई: फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रूग्णांच्या सर्वाधिक मृत्यूमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे. परंतु, या आजाराचे वेळीच निदान आणि लवकर उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करणं फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे रूग्णाला निरोगी आयुष्य जगायला मदत मिळू शकते.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. 2018 मध्ये ग्लोबोकॉनने जाहिर केलेल्या आकेडवारीनुसार, जगभरात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे 63,475 इतका मृत्यूदर असून भारत मृत्यूदरात चौथ्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये जगभरात अंदाजे 2.1 दशलक्ष नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचं आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मानवी शरीरात फुफ्फुस हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीराचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता योग्य असणं गरजेचं आहे. फुफ्फुस रक्ताच्या प्रवाहातून शरीरातील उर्वरित भागात ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा कर्करोग होतो. कर्करोग फुफ्फुसांमध्ये सुरू होतो तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असे म्हणतात. हा कर्करोग शरीरातील लिम्फ नोड्स किंवा इतर अवयवांमध्ये पसरतो. एवढेच नाही तर, कधीकधी दुसऱ्या अवयवात सुरू झालेला कर्करोग फुफ्फुसात पसरतो.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रकार
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यात स्माल(SCLC) आणि नॉन स्माल (NSCLC). स्माल(SCLC) म्हणजे अतिरिक्त प्रमाणात धुम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तर नॉन स्माल (NSCLC) म्हणजे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन धूर फुफ्फुसात गेल्यासही कर्करोग होऊ शकतो.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे
फुफ्फुसांच्या कर्करोगाची कारणे
फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा धोका म्हणजे सिगारेटचं सेवन. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे धुम्रपानाचे अतिरिक्त सेवन हे 90 टक्के जबाबदार आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी धुम्रपान करणं सोडणं गरजेचं आहे, याबाबत समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. प्रदूषित वातावरण आणि फुफ्फुसातील फायब्रोसिस देखील या प्रकारच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान कसे करावेत
फुफ्फुसाचा कर्करोग शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे, थुंकीची तपासणी, बायोप्सी, सीटीस्कॅन आणि पेट-सीटीस्कॅन अतिशय फायदेशीर ठरत आहे. याशिवाय एन्डोब्रोन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबीयूएस) या चाचणीमुळेही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान पटकन करता येते. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास अन्य अवयवांना होणारे नुकसान टाळता येऊ शकतात.
फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचार
रूग्णाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हे तपासून डॉक्टर उपचाराची पुढील दिशा ठरवतात. कर्करूग्णाला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया अशापद्धतीने उपचार दिले जातात. याशिवाय औषधोपचार आणि इम्युनोथेरपीद्वारेही रूग्णांवर उपचार केले जात आहेत.
हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूक निकाल: कोकणात सेनेचा बालेकिल्ला खोटा ठरवला, भाजपची टीका
प्रतिबंधात्मक उपाय
फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये यासाठी धूम्रपानाची सवय सोडावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे, धूम्रपान करणार्यांच्या आसपास राहू नका. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ नका. नियमित शारीरिक व्यायाम करा यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Lung cancer leading causes of death for most cancer patients