Tribal Community : आदिवासी समाजबांधवांची पारंपरिक रोजगारातून व्यवसायाकडे वाटचाल

काजूच्या झाडावर चढून काजूबिया काढणारा तरुण, आणि सोललेले ओले काजूगर घरोघरी नाही तर बाजारपेठेत विकणाऱ्या महिला, असे आदिवासी समाजात हमखास दिसणारे चित्र आता हळूहळू बदलत आहे.
Tribal Women
Tribal Womensakal
Summary

काजूच्या झाडावर चढून काजूबिया काढणारा तरुण, आणि सोललेले ओले काजूगर घरोघरी नाही तर बाजारपेठेत विकणाऱ्या महिला, असे आदिवासी समाजात हमखास दिसणारे चित्र आता हळूहळू बदलत आहे.

महाड - काजूच्या झाडावर चढून काजूबिया काढणारा तरुण, आणि सोललेले ओले काजूगर घरोघरी नाही तर बाजारपेठेत विकणाऱ्या महिला, असे आदिवासी समाजात हमखास दिसणारे चित्र आता हळूहळू बदलत आहे. आंबा, काजू, कैऱ्या, करवंद जमा करण्यासाठी रानोमाळ फिरणारे आदिवासी आता व्यावसायिक बनत आहेत. अनेक आदिवासी कुटुंब हंगामामध्ये काजू व आंबा बागा यांचे ठेके घेऊ लागले असून भावी पिढीही व्यवसायामध्ये येऊ लागले आहे. आदिवासी समाजाच्या प्रगतीचे हे चित्र नक्कीच दिलासाजनक आहे.

आदिवासी म्हणजे जंगलचा राजा. जंगलच्या साधनसामुग्रीवर त्याचा पहिला अधिकार. कैऱ्या, पिकलेला आंबा, ओले काजूगर, करवंद याशिवाय विविध प्रकारचा रानमेवा आदिवासी महिला बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन बसलेल्या दिसतात. आदिवासी समाजातील पुरुष रानामध्ये जाऊन हा रानमेवा गोळा करतात.

झाडावर चढून काजू बिया काढतात. महिला या काजू बिया साफ करून त्यातील ओले काजूगर विक्रीसाठी आणतात. यातून मिळणाऱ्या चार पैशांवर त्‍यांची रोजीरोटी चालते. परंतु आता जंगलाचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीण भागात अनेक फार्महाऊस व बागायती तयार होऊ लागली आहेत. त्यामुळे आदिवासींना परंपरेने मिळणारी रानमेव्यातील हक्काची साधने कमी झाली आहेत. त्‍यामुळे आदिवासी कुटुंबांनीही उदरनिर्वाहासाठी वेगळी वाट निवडली असून आदिवासी तरुण व त्यांचे कुटुंबे नवीन व्यवसायामध्ये स्थिरावू लागली आहेत.

दक्षिण रायगडमधील अनेक तालुक्यात तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सीमांवर राहणारे अनेक आदिवासी वाड्यातील तरुणांना आता आंबा व काजू व्यवसायात यश मिळत आहे. सुमारे ४० हून अधिक कुटुंबे आपल्या आदिवासी बांधवांनाबरोबर घेत व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्‍नशील आहेत. कोकणात अनेक ठिकाणी आंबा, काजूच्या बागा मोहर लागण्याच्या सुमारास आदिवासी बोली लावून ठेका पद्धतीने राखण करण्यासाठी घेतात. मूळ बागायतदाराला ठराविक रक्कम अदा केल्यानंतर उरलेला सर्व नफा हा आदिवासींचा असतो. या करिता अनेक आदिवासी आपल्या कुटुंबासह बागायत असलेल्या ठिकाणी वास्तव्य करतात. मोहोर आल्यापासून आंबा व काजूची फळे तयार होईपर्यंत या समाजाचा डेरा तेथेच असतो. संपूर्ण बागाच ठराविक रकमेला घेतल्या जातात. व त्यातून निघणारी फळे विक्रीसाठी आणल्यानंतर चांगले उत्पन्न कमावू लागले आहेत.

हंगामात लाखभराची कमाई

तालुक्यातील कोतुर्डे ,मांडले, नरवण रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील मंडणगड, लाटवण, कडूक म्हाप्रळ या भागामध्ये अनेक आदिवासी अशा प्रकारचा व्यवसाय करतात. हंगामामध्ये लाखभर रुपयांची कमाई सहजगत्या होते. बागेमधील फळे आदिवासी महिला विक्रीसाठी नेत असल्याने त्यांनाही रोजगार मिळतो, असे भैरू वाघमारे या तरुणांने सांगितले. आदिवासी तरुण नवीन व्यवसायात सक्रिय झाल्‍याने त्‍यांचे जीवनमान बदलल्याचे चित्र दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com