

Mahanagar Gas Limited PNG Supply
ESakal
मुंबई : मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) सुविधा उपलब्ध केली आहे. इंधनाची वाढती मागणी तसेच अखंड पुरवठा आणि अधिक सुरक्षित व पर्यावरणपूरक असणारी ही पीएनजी सेवा अधिक लोकप्रिय होत आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी पीएनजी सेवा लागू केली नसल्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने पीएनजी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले असून मोठा इशारा जारी केला आहे.