कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ढकललं पुढे, आता 'या' तारखेपासून होणार अधिवेशन...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून ही महत्त्वाची बैठक पार पडली.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून ही महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रात रोज समोर येणारा कोविड रुग्णांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. या धर्तीवर येत्या काळात येऊ घातलेलं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेश पुढे ढकलण्यात आलं आहे.  जून महिन्यात होणारं पावसाळी  अधिवेश आता ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.    

मोठी बातमी कोरोना, पावसाबरोबरच आता मुंबईकरांसमोर मोठं संकट! जायचं तरी कुठे?

खरंतर २२ जूनपासून यंदाचं पावसाळी अधिवेशन पार पडेल अशी शक्यता होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि एकंदर राज्याची कोविड रुग्णांची परिस्थिती पाहता आता यंदाचं पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून घेण्याचं ठरलंय. दरम्यान या बैठकीत अधिवेशन किती दिवस घायचं हे देखील चर्चिलं गेलं. या आधीच खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन एक किंवा दोन आठवड्याचं घ्यावं अशी चर्चा होती. ३ ऑगस्ट पासून सुरु होणारं अधिवेशन १५ दिवस चालणार आहे. 

मोठी बातमी शाब्बास मुंबईकर! कोरोना रोखण्यासाठी मुंबकरांची अशीही कामगिरी...

दरम्यान, पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन देखील घेतले जाऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने आता यंदाचं पावसाळी अधिवेशन साधारणतः महिनाभर पुढे ढकललं आहे.

maharashtra assembly monsoon session postponed session will start from third august 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra assembly monsoon session postponed session will start from third august