
जम्मू काश्मीरमध्ये पहलागाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांवर कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर भारताने देशभरात पाकिस्तानशी कनेक्शन असलेल्या संशयितांची चौकशी आणि तपास सुरू केलाय. यात आतापर्यंत अनेक जण पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं आढळून आलंय. युट्यूबर ज्योती मल्होत्रानंतर अनेक जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी अटकही केलीय. यात एका सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. आता ठाण्यातही एकाला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीय.