भाजपकडून दंगलीचे सुनियोजित कारस्थान : नवाब मलिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक

भाजपकडून दंगलीचे सुनियोजित कारस्थान : नवाब मलिक

मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. मात्र अमरावतीत झालेली दंगल हे भाजपचे सुनियोजित कारस्थान होते. यासाठी मुंबईतून एका आमदाराच्या हस्ते पैसे पाठवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले की, जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढतो. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. याचा धडा भाजपला बंगालमधे मिळाला. महाराष्ट्रातही भाजप तसेच कटकारस्थान रचत असल्याचे लवकरच उघड होईल. पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईल, असा दावाही मलिक यांनी केला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

वसीम रिझवी यांच्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चातील दगडफेकीप्रकरणी अटक केलेल्या नगरसेवकाने एमआयएममध्ये प्रवेश केल्याचेही ते म्हणाले.

‘मालेगावचा नगरसेवक एमआयमचाच’

मालेगावचे नगरसेवक मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर काही नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवकदेखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत, असा खुलासाही नवाब मलिक यांनी केला.

loading image
go to top