

Maharashtra Budget 2026
ESakal
मुंबई : आगामी आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) विक्रमी संकलन आणि बाजारातील अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५–२६ या वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. हा दर देशाच्या अपेक्षित ७.६ टक्के वाढीपेक्षा अधिक आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये (जीएसडीपी) १०.४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. राज्यावरील कर्जाचा भारही वाढणार असून तो ९.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्याचे अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी गुरुवारी विधानसभेत राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.