esakal | उद्धव ठाकरेंनी केलं मोदींच अभिनंदन, म्हणालेत..
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंनी केलं मोदींच अभिनंदन, म्हणालेत..

उद्धव ठाकरेंनी केलं मोदींच अभिनंदन, म्हणालेत..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. याबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली. दरम्यान यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी अभिनंदन केलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. 

मोठी बातमी - 'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

हे आहे संजय राऊत यांचं ट्विट :  

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करणयाचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य पार पडल्या बद्दल अभिनंदन : मा. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री असं या ट्विटमध्ये म्हटलंय. 

मोठी बातमी - नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन... 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशात शिसवेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

तर दुसरीकडे, राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या ट्विटचा रोख हा सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळेच आज अयोध्यात राम मंदिर उभं राहतंय असा आहे. यामध्ये केंद्र सरकार केवळ नियमांचं पालन करतेय असं उद्धव ठाकरे यांना सुचवायचंय असं बोललं जातंय.    

मोठी बातमी - "राष्ट्रवादीची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!"

केंद्राने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी ट्रस्ट बनवायला परवानगी दिलीये. आज लोकसभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल घोषणा केली. याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणालेत की, स्थापित होणारं ट्रस्ट ही स्वायत्त संस्था असेल. श्रीराम मंदिर आणि त्यासंबंधित सर्व निर्णय हे या ट्रस्टच्या माध्यमातून घेतले जातील.   

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा :  

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होतायत. अशात शिवसेनेने याआधीच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल माहिती दिलीये. ७ मार्चला शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.

maharashtra CM udhav thackeray congratulates PM narendra modi for giving approval of shriram mandir trust