

BMC Election Congress
ESakal
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहे. सर्वत्र मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीसाठी आघाडीला तडा गेला आहे. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.