Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू
EV Toll Waiver : घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर आज पाच महिन्यांनी त्याची अंमलबजावणी होत आहे. दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावर ही इलेक्ट्रिक वाहनांना पुढील दोन दिवसांत टोलमाफी मिळणार असल्याचे संकेत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने असणाऱ्यांना गणेशोत्सवाआधी मोठा दिलासा मिळाला आहे. या वाहनांना आजपासून अटल सेतूवर टोल वसूल केला जाणार नाही. गुरुवारी २१ ऑगस्टपासून टोल माफी करण्यात आली असून आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ शकते.