

Mumbai Government land will be made encroachment-free
ESakal
मुंबई : सरकारी जमिनीवरील वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे मुंबईला मोकळ्या जागांची तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. झोपडपट्टीवासीय आणि भूमाफियांनी हजारो एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. सरकारी जमिनीवरील अनियंत्रित बेकायदेशीर अतिक्रमण हे एक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय आव्हान बनले आहे. मोकळ्या जागेच्या कमतरतेमुळे नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.