

Maharashtra Government Contractors Launch Call CM Deputy CM Movement Over 86000 Crore Unpaid Bills and Pending Dues
sakal
मुंबई: राज्य सरकारकडे गेल्या दीड वर्षांपासून असलेली विविध विभागांची ८६ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी मिळावी यासाठी राज्यातील ठेकेदारांनी सरकारविरोधात एका अभिनव आंदोलनाची हाक दिली आहे. थकीत बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य जलपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आजपासून ‘कॉल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री’ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.