
Document Registration Rule
ESakal
मुंबई : मुंबईतील कागदपत्र नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक कार्यालय नोंदणीसाठी क्षेत्र सीमा अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता नागरिक सहा नियुक्त मुद्रांक कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयात कागदपत्र नोंदणी करू शकणार आहेत.