Bima Yojana: आशा सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Asha Worker Bima Yojana: आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कामगार आणि आशा वर्कर्सना ईएसआयएस विमा योजनेच्या कक्षेत आणण्याचे निर्देश दिले आहेत.
Maharashtra Asha Worker Bima Yojana

Maharashtra Asha Worker Bima Yojana

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि कमी उत्पन्न असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या मेहनती कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी राज्य सरकार राज्य कामगार विमा योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबितकर यांनी राज्यातील, मासिक २१,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आशा कार्यकर्त्या आणि कंत्राटी (एनएचएम) कामगारांसाठी कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIS) व्याप्ती वाढवण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com