

Maharashtra Police DG Loan Scheme
ESakal
महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. राज्य सरकारने निधीअभावी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली "डीजी लोन" (गृह बांधकाम आगाऊ) योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेसाठी सरकारने ₹१,७६८ कोटींचा मोठा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो पोलिस कुटुंबांना आनंद झाला आहे. यवतमाळसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पोलिस कर्मचाऱ्यांना अजूनही ब्रिटिशकालीन किंवा जीर्ण सरकारी वसाहतींमध्ये राहावे लागत आहे.