

Ladki Bahin Yojana
ESakal
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ६८ लाख महिलांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे सरकारची वार्षिक १२,२४० कोटी रुपयांची बचत होईल. लाडकी बहीण योजनेवरील वार्षिक खर्च ४३,७४० कोटी रुपयांवरून ३१,५०० कोटी रुपयांपर्यंत कमी होईल. सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ मार्च होती.