

Maharashtra School Bus Rules
ESakal
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्कूल बसेससाठी नवीन आणि अधिक कठोर नियम लागू केले आहेत. सुधारित नियमांनुसार, स्कूल बसेस आता २० वर्षांपर्यंत चालवता येतील, परंतु सर्व विहित सुरक्षा मानकांचे पालन करणे अनिवार्य असेल. प्रत्येक शालेय बस, शैक्षणिक संस्थेची बस आणि शालेय व्हॅनमध्ये जीपीएस-आधारित वाहन स्थान ट्रॅकिंग उपकरण, पॅनिक बटण, सीसीटीव्ही, डिजिटल सुरक्षा देखरेख प्रणाली आणि सर्व आसनांवर सीट बेल्ट असणे बंधनकारक असेल.