मुंबईत 3000 खाटांची व्यवस्था केली; मात्र अद्यापही त्या आहेत रिकाम्या.. कारण वाचाल तर धक्का बसेल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ccc

आयसोलेशन सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध नसल्याने बहुतेक आयसोलेशन सेंटरमधील खाटा रिकाम्या ठेवाव्या लागत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत 3000 खाटांची व्यवस्था केली; मात्र अद्यापही त्या आहेत रिकाम्या.. कारण वाचाल तर धक्का बसेल...

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने पालिकेने युद्धपातळीवर आयसोलेशन सेंटर उभे केले आहेत. मात्र आयसोलेशन सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध नसल्याने बहुतेक आयसोलेशन सेंटरमधील खाटा रिकाम्या ठेवाव्या लागत असल्याचे समोर आले आहे. आयसोलेशन सेंटरमधील 3 हजार खटांपैकी केवळ 50 खाटांवर रुग्ण आहेत. 

वाचा ः योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली

मोठ्या आयसोलेशन सेंटरपैकी एक असलेल्या गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवरील 1240 खाटांपैकी केवळ 50 खाटांवर रुग्ण आहेत. तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 1080 खाटांची क्षमता असलेल्या आयसोलेशन सेंटरमधील सर्व खाटा रिकाम्या आहेत. महालक्ष्मी येथील 350 खाटांचे आयसोलेशन सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका नसल्याने ही सेंटर सुरू होण्यात अडचणी आहेत. शिवाय पावसाळा दुरु झाला की जम्बो केंद्रे कितपत टिकाव धरतील का ही प्रश्नच आहे. बीएमसी आणि राज्य सरकार हे जम्बो सेंटर उभारत आहेत. सरकार त्यांना फील्ड हॉस्पिटल्स म्हणून संबोधत असले तरी प्रत्यक्षात ती केवळ अलगीकरण केंद्र आहेत. त्यांच्याकडे कार्यक्षम आयसीयू, व्हेंटिलेटर नाहीत. बीकेसी सेंटरची बुधवारी मुसळधार पावसात झालेली दुरवस्था लपून राहिलेली नाही. त्यामुळे सरकारची ही जम्बो सेंटर संकल्पना कितपत यशस्वी ठरेल याबाबत याबाबत शंका आहे.

वाचा ः निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री...

पावसाळ्यामध्ये ही केंद्रे चालवणे हे एक आव्हान असेल, अशी कबुली एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने दिली.  “आतापर्यंत सर्व केंद्रांमध्ये अनेक खाटा रिकाम्या आहेत. बहुतेक केंद्रे कार्यरत नाहीत. एनएससीआय येथील केंद्र सोडून इतर केंद्रांवर सध्या रुग्णांना ठेवत नाहीत. त्यामुळे इतर केंद्र पावसाळ्यात वापरण्या योग्य असतील की नाही, याची खात्री नसल्याचेही ते पुढे म्हणाले. मंगळवारी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे नवीन बांधलेले 1,080 बेडचे केंद्र रिकामे केले. ते तात्पुरते बांधकाम असल्याने 242 कोव्हिड रुग्णांना वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आणि इतरांना गोरेगावमधील नेस्को विलगीकरण केंद्रात हलविण्यात आले. बाकी सेंटर मुसळधार पावसाळ्यातील परिस्थिती झेलू शकणार नाहीत, याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळेच बुधवारनंतर एकाही रुग्णाला बीकेसी येथील केंद्रात पुन्हा हलवले नाही. बीकेसी केंद्रातील रुग्णांना हलवल्यानंतरही जवळपास 500 बेड असलेल्या एनएससीआय डोममधील अर्ध्याच खाटा भरल्या होत्या. पालिकेचे वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र येथील 150 बेडचे केंद्र देखील रिक्त पडून आहे.

वाचा ः नौदलातही पर्यावरण रक्षणाचे उपाय; नवनवीन साधनांचा करणार वापर

पावसाळ्यात बेडची गरज भासू शकते : अस्लम शेख
कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकार तयारी करीत असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. पावसाळ्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास आम्हाला 4000 ते 5000 स्पेअर बेडची गरज भासू शकते. लॉकडाऊन वाढल्यामुळे सध्या इतकी गरज लागली नव्हती; मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडतील. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील इतर रुग्णालये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या मान्सूनसंबंधी आजारांसाठी तयार ठेवायची आहेत, असे ही ते पुढे म्हणाले. कोरोनाची लक्षणे आढळणारे रुग्ण या जम्बो सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहेत; जेणेकरुन नॉन कोव्हिड रूग्णांसाठी अन्य रुग्णालये मोकळी ठेवता येतील असेही शेख पुढे म्हणाले. 

वाचा ः मुंबईत मे महिन्यात केल्या गेलेल्या टेस्टिंग्सवर प्रश्नचिन्ह, एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या तर दुरीकडे कमी टेस्टिंग्स?

या ठिकाणी रुग्ण ठेवणे धोकादायक
डॉक्टर व परिचारिकांचा तुटवडा असतानाच पावसाची संज्ञा देखील समोर उभी आहे. खुल्या जमिनीवर उभारण्यात आलेली काही केंद्रे पावसाळ्यात निरुपयोगी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाण्याची गळती आणि शॉर्टसर्किटचा धोका, अशा विविध समस्या तेथे उद्भवू शकते. त्यामुळे तिथे रुग्ण ठेवणे खूप धोकादायक आहे. 

वाचा ः कोरोना आणि विविध रक्तगट, कुणाला आहे सर्वाधिक धोका? नवीन संशोधन म्हणतंय...

गोरेगाव रुग्णालयातील नेस्को सेंटरमध्ये 1240  रुग्ण राहू शकतात, तेथे ऑक्सिजनची सुविधा आहे.  परंतु, गुरुवारपर्यंत तेथे सुमारे 50 रुग्ण होते. पालिकेने त्यांच्याकडे 3000 बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे; पण तिथे रुग्ण व डॉक्टर कुठे आहेत?  तेथे बरेच गैरव्यवस्थापन झाले आहे.
- दीपक ठाकूर, भाजप नगरसेवक

20 मेपासून तयार झालेल्या मुलुंड जकात नाका येथील आणखी 125 बेडचे विलगीकरण केंद्र, तेथे कोणतेही डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध नसल्यामुळे अद्याप रिकामेच आहे. तेथे एकही रुग्ण नाही. “तीन आठवड्यांपासून बीएमसीला 120 खाटांचे केंद्र चालविण्यासाठी डॉक्टर  नाहीत. ते ओपन ग्राऊंडवर येणारे 1,000 बेडचे सेंटर कसे चालवतील?  हे सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय करत आहेत बाकी काही नाही.
- मिहीर कोटेचा, भाजप आमदार 

loading image
go to top