esakal | योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule
  • योग्य वेळी उपचार मिळाल्याने गर्भवती मातेचा जीव वाचला
  • खासदार सुप्रीया सुळेंच्या मध्यस्तीने तात्काळ मिळाला उपचार

योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनासारख्या रोगामुळे एकीकडे गर्भवती मातांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतांना, दुसरीकडे मात्र, एका सात महिने पुर्ण होणाऱ्या गर्भवती महिलेला अतिरक्तस्त्रावाचा त्रास होऊ लागला. त्यामूळे जिवाचा धोका असतांना, खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने योग्य वेळेवर उपचार मिळू शकल्याने गर्भवती महिलेचा जीव वाचवता आला आहे, दुर्दैवाने सात महिन्याचे बाळ मात्र दगावले आहे. 

...भारतात 'यासाठी' व्हिडिओ पाहणाऱ्यांचे प्रमाण जास्त!

घाटकोपर परिसरातील वगारे कुटूंब दोन महिन्यानंतर गोडंस बाळ जन्माला येण्याचे वाट पाहत होते. मात्र, सात महिन्याची गर्भवती असलेल्या श्वेता वगारे यांना अचानकच अती रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे रात्रीच स्थानिक नेहमीच्या डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवर अत्याधुनिक सुविधा नसल्याने, वगारे यांना वाडीया रुग्णालयांमध्ये जाण्याचे सांगितले. मात्र, वाडीया रुग्णालयांमध्ये कोवीड टेस्ट केल्या शिवाय घेत नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय रुग्णालयामध्ये खाट शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले होते. 

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लॉक डाऊनमधील मुंबईकरांना सरकारने दिली 'ही' मुभा...

मात्र, यादरम्यान अतिरक्तस्त्रावर होत असल्याने मातेच्या आणि बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. तर उपचार मिळणे सुद्धा फार आवश्यक होते. मात्र, कोवीड-19 च्या काळात प्रत्येक रुग्णाला अनेक नियमांचे पालन करावे लागत असल्याने उपचाराला उशीर झाल्यास कोणताही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता असतांना, वगारे यांच्या कुटूंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहाय्यक सुरेश पाटील यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती देताच, सुळे यांच्या मध्यस्तीने पाटील यांनी जे जे रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळवून दिला.  

बापरे! मुंबईत 'हे' आहे प्रदुषणाचं मुख्य केंद्र; पश्चिम उपनगरं आहेत सर्वाधिक प्रदूषित..

त्यामुळे दुर्दैवाने वगारे कुटूंबात येणाऱ्या नवजात बालक दगावल मात्र, अतिरक्तस्त्रांवामूळे जिवाला धोका असलेल्या मातेला वाचवण्यात यश आले आहे. जे जे रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.रवि कांबळे यांनी रुग्णालयामध्ये गर्भवती मातेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली तर, यादरम्यान मातेला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विशेष कार्याधिकारी डाॅ,सचिन जाधव, डाॅ.अमोल लगड यांनी परिश्रम घेतले आहे. 

किळसवाणा प्रकार ! उत्कृष्ट जेवणाच्या नावाखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलं आळ्या आणि माशीयुक्त अन्न

अतिरक्तस्त्रावामूळे श्वेताची तब्येत नाजूक होत होती. अशा परिस्थितीत वाडिया रुग्णालयाने सुद्धा उपचार करण्यासाठी नाकारल्याने, तब्येत आणखीच खराब झाली होती. मात्र, खासदार सुप्रीया सुळे आणि यांचे स्वीय सहाय्यक पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे अत्यंत कठीण परिस्थितीत श्वेताला सुरक्षीत ठेवण्यात यश आले आहे.
- जीवन वड्डे, गर्भवती महिलेचा भाऊ, भाईंदर

loading image
go to top