Gokul Milk Union five nominated directors ordinance
esakal
मुंबई : राज्यातील ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या आणि शासकीय साहाय्य मिळणाऱ्या संघीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर शासनाकडून पाच नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याच्या निर्णयावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी (Gokul Milk Union government nominated directors news) केली. या अध्यादेशामुळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’वर राज्य सरकारला पाच नामनिर्देशित संचालक नेमण्याचा व त्यातील चार संचालकांना मतदानाचाही अधिकार मिळाला आहे.