Maharashtra Government: सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयीन प्रशासन अधिक गतिमान होणार; ३३ विभागांचे ४५ विभागांत रूपांतर

Maharashtra Secretariat restructuring 2026: मंत्रालयीन कामकाजात वेग, समन्वय आणि जबाबदाऱ्या स्पष्ट; विभागांचे पुनर्गठन करून निर्णयप्रक्रिया सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न
Cabinet Approves Secretariat Overhaul to Boost Efficiency and Decision-Making

Cabinet Approves Secretariat Overhaul to Boost Efficiency and Decision-Making

sakal

Updated on

मुंबई: प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन ३३ विभागांची संख्या वाढवून ४५ करण्यात येणार आहे. या विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ आणि ‘ईझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर भर देण्याबाबतचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच निश्चित केले आहे. मंत्रालयीन विभागांत सुसूत्रता आणण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात आली असून, यामुळे निर्णयप्रक्रियेचा वेग वाढणार आहे. तसेच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी समन्वय साधण्याचा वेगही वाढणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com