esakal | कोरोनामुक्तीसाठी महाराष्ट्र सरकारचा 'मेगा प्लान'

बोलून बातमी शोधा

corona vaccination
कोरोनामुक्तीसाठी महाराष्ट्र सरकारचा 'मेगा प्लान'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाचे लाखो सक्रीय रुग्ण असून मृतांची संख्या देखील रोज वाढत आहे. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनसारखा कठोर पर्याय अवलंबावा लागतो. ज्यामध्ये अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. मागच्यावर्षी सुद्धा कोरोनाची पहिली लाट थोपवण्यासाठी अनेक महिने लॉकडाउन होता. ज्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी एक मोठी चांगली बातमी

भविष्यात तिसरी लाट येण्याची सुद्धा शक्यता आहे. आता कोरोनाविरोधातील लढाईत सरकार निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबवण्याची योजना आहे. इस्रायलने सुद्धा अशाच पद्धतीने लसीकरण करुन कोरोनाची साखळी मोडली होती.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

राज्य सरकार कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय आहे. मोफत लसीकरण करण्यासाठी दर महिन्याला २ कोटी लस विकत घेण्याचे नियोजन असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सिरम इन्सिट्यूटकडे महिन्याला दीड कोटी कोविशिल्ड लशींची मागणी राज्य सरकारने नोंदवली असली तरी त्यांच्याकडून सुमारे १ कोटी लशी मिळणार आहेत. भारत बायोटेककडे महिन्याला १ कोटी कोव्हॅक्सीन लशींची मागणी नोंदवली आहे, ५० ते ६० लाख लसी या आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्य सरकार खरेदी करणार आहे.