
मुंबई - एकीकडे महाराष्ट्र कोरोनासोबत दोन हात करताना पाहायला मिळतोय. तर दुरीकडे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. याला कारण आहे राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी दिलेलं एक पत्र.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना महाराष्ट्र राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं एक पत्र घेऊन वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृह मंत्रालयावर आणि अनिल देशमुखांवर टीका केली जातेय. सकाळ वृत्तपत्राने याबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणी आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येतायत.
याप्रकरणी काल मध्यरात्रीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत, अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली होती. आज सकाळी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आल्याचं गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आलं.
दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत होती. अशात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत त्यांना उपद्रवी असं संबोधलंय.
काय म्हणालेत अनिल देशमुख ?
maharashtra home minister anil deshmukh retaliates to the kirit somayya calls him destructive person
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.