Ladki Bahin Yojana latest news
esakal
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना मासिक 1800 रुपये देण्यास सुरुवात झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) केलेल्या फॅक्टचेकमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.