esakal | Maharashtra Lockdown: 'ST केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच'

बोलून बातमी शोधा

Anil Parab
Maharashtra Lockdown: 'ST केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच'
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असेल. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब एस.टी वाहतुकीसंदर्भातली माहिती दिली आहे. एस.टी अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एसटीची संख्या अर्थातच कमी असेल.

अत्यावश्यक सेवेसाठी एसटी सुरु राहतील असं सांगत आज मंत्रालयात ४.३० वाजता महत्वाची बैठक आहे. या बैठकीत खाजगी वाहतूक, बेस्ट आणि एसटी कर्मचा-यांची सुरक्षा यांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असंही परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसंच जिल्ह्या बाहेरुन येणा-या लोकांच्या क्वारंटाईनसाठी किती कालावधी असेल याबाबत मंत्रालयातील बैठकीत चर्चा होईल, असंही ते म्हणालेत.

हेही वाचा: '18 वर्षावरील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप लेखी आदेश नाहीत'

२५ टक्के मालवाहतूक एसटी करेल. राज्य सरकारनं रेमडेसिवीरची मागणी केली असून जसजसा पुरवठा होईल तसतसं रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठा यात किती तफावत आहे हे लक्षात येईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या टीकेपेक्षा जीव महत्वाचे त्यामुळे ब्रेक द चेनचे निर्बंध आवश्यकच आहेत. नाशिकमधील दूर्घटनेबाबत राजकारण करण्याची ही वेळ नाही, असं म्हणत अनिल परब यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या येणार आहे. आज ऑक्सिजन आणखी कुठून मिळवता येतील यााबत नवे पर्याय शोधले जातील. ऑक्सिजनचे टँकर आल्यानंतर त्याचं वितरण करणं ही परिवहन विभागाची जबाबदारी असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी होणार चौकशी

या लोकांसाठीच केवळ लोकल रेल्वे प्रवास

राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लोकल, मेट्रो, मोनो प्रवासात फक्त सरकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार रेल्वे, मेट्रो, मोनो प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासह स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्या जिथे थांबतात, त्यांची थर्मल चेकिंग केली जात आहे. यासह कोरोना चाचणी केली जात आहे. लोकल प्रवासात कोणत्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे, याची यादी अद्याप आली नाही. नवीन यादी जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कॅटेगिरीप्रमाणे लोकल प्रवासात परवानगी देण्यात येईल. यासह आता रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंदी करण्यासाठी सुरूवात केली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले जाणार आहे. आज लोकल फेऱ्यांबाबतचे नियोजन केले जाणार आहे. काही स्थानकांचे प्रवेशद्वार बंद केले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार त्यांचे पालन करण्यात येईल, असे मेट्रो आणि मोनो प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.