Azad Maidan One-Day Permission to Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला केवळ एका दिवसीच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर सरकार काय भूमिका घेणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.