Mantralaya Guidelines: कामानिमित्त मंत्रालयात जाणार आहात? 'या' नव्या मार्गदर्शक सूचना लक्षात राहू द्या

गृहमंत्रालयानं या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
Mantralaya-Mumbai
Mantralaya-Mumbaisakal

मुंबई : महत्वाच्या कामांसाठी जर तुम्ही मुंबईतल्या मंत्रालयात जाणार असाल तर तुम्हाला नव्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. गेल्या काही काळापासून मंत्रालयात येणाऱ्या लोकांकडून सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेऊन जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढल्यानं गृहमंत्रालयानं या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. (Maharashtra Mantralaya new Guidelines for enty Mumbai News)

Mantralaya-Mumbai
Pankaja Munde: "देव न करो, ती वेळ येवो"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

काय आहेत नवे नियम?

  1. मंत्रालयात जर कोणाला यायचं असेल तर त्यांना विविध प्रकारचे पास बंधनकारक असणार आहेत.

  2. लोकप्रतिनिधींना देखील पास काढल्याशिवाय आत सोडण्यात येणार नाही.

  3. लोकप्रतिनिधींसोबत येणाऱ्या लोकांनाही पासशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.

  4. ज्या मजल्यावर जायचं आहे त्याच मजल्याचा पास मिळणार आहे, त्याशिवाय इतरत्र कुठेही फिरता येणार नाही.

  5. संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत मंत्रालयातील कामकाज सुरु असते. त्यामुळं त्यानंतर मंत्रालयात रेंगाळता येणार नाही.

  6. लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी यांना वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार.

  7. वाहनांसाठी देखील पास असणार आहे.

  8. प्रत्येक मजल्यासाठी वेगळ्या कलर कोडचा पास देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com