Pune Election News: विरोधकांचे पारडे जड! ‘पदवीधर’ महाविकासकडे ‘शिक्षक’ महायुतीकडे; पुण्यातून हर्षदा देशमुख, कौस्तुभ गावडे विजय

Pune Graduate and Teachers Election Results 2026 Full Details: पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुखांचा विजय; शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयी, निकालात काय घडलं?
Maharashtra Legislative Council Election Results 2026 MVA Wins Graduate Seats While Mahayuti Secures Teachers Constituencies

Maharashtra Legislative Council Election Results 2026 MVA Wins Graduate Seats While Mahayuti Secures Teachers Constituencies

sakal

Updated on: 

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील लढतीत मतदारांनी संमिश्र कौल दिला. तीन पदवीधर मतदारसंघांपैकी पुणे आणि औरंगाबाद मराठवाडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विजय मिळवला, तर नागपूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी कडवी झुंज देत जागा राखली. शिक्षक मतदारसंघांमध्ये पुण्यात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला, तर अमरावतीमध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी पुन्हा बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com