मुंबई : युनेस्कोकडून देण्यात येणारा यंदाचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. कुणा भारतीयाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रणजितसिंह डिसले यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डिसले यांचे भरभरून कौतुक केलं.
'ग्लोबल टीचर पुरस्कार' विजेते डिसले यांनी QR कोड पद्धतीचा वापर पाठ्यपुस्तकांमध्ये चालू केला. त्यांच्या पद्धतीचा वापर देशपातळीवर देखील सुरु झाला. त्यानंतर त्याची दखल जागतिक पातळीवर देखील घेण्यात आली आणि डिसले यांच्या अनोख्या पध्द्तीचा जागतिक स्तरावर वापर देखील सुरु झाला. त्यामुळे डिसले यांनी शैक्षणिक क्षेत्रात घडवलेला बदल अत्यंत क्रांतिकारक मानला गेला आहे.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2020
डिसले कुटुंबीयांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून डिसले यांचे राज ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
maharashtra navanirman sena chief raj thackeray met ranajitsingh disle
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.