
Palghar Bomb Threat: पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात मेल आल्यानं एकच खळबळ उडाली. त्यामुळं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामी करण्यात आलं आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब विरोधी पथक, डॉग स्कॉक्ड यांच्या मार्फत तपास सुरू करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आहे.