

Maharashtra Police Transfer 2026
ESakal
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात राज्य सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशामुळे राज्यातील पोलीस प्रशासनात काही महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. मात्र, या सर्व बदल्यांमध्ये ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने विशेष चर्चा सुरू झाली आहे.