नवनियुक्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लवकरच पदभार स्वीकारणार

तुषार सोनवणे
Sunday, 7 February 2021

नाना पटोले ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत.

मुंबई  : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवारी, 12 फेब्रुवारीरोजी दुपारी 2.30 वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. 

1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून "अंग्रेजो चलो जावो, भारत छोडो' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रीमंडळातील कॉंग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

maharashtra political marathi Newly appointed Congress state president Nana Patole take over soon mumbai politics updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra political marathi Nana Patole take over congress state president soon mumbai politics updates