ठाणेकरांचा जल्लोष; फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव

मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा केली.
Maharashtra Politics Eknath shinde take oath of New Chief Minister of maharashtra thane
Maharashtra Politics Eknath shinde take oath of New Chief Minister of maharashtra thane sakal

ठाणे : मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा केली. त्यानंतर ठाणे शहरातील शिंदे समर्थकांकडून एकच जल्लोष केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर समर्थकांकडून ढोल-ताशाच्या गजरात फटके फोडत, पेढे वाटत जल्लोष व्यक्त केला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांमध्येदेखील आनंदाचे वातावरण पसरले होते.

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप, त्याचबरोबर आवाहनेदेखील करण्यात येत होती. त्यामुळे राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. आता, त्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. गुरुवारी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाण्यातील शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांच्या घरासमोर ढोल-ताशांच्‍या गजरात, पेढे वाटप, फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन समर्थक थिरकत होते आणि शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करत होते. पाऊस सुरू असतानाही शिंदे समर्थकांचा जल्लोष अवर्णनीय होता. शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून काठावर असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे आता शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com