

BJP Leader Join Shinde Shivsena
ESakal
उल्हासनगर : भाजपच्या माजी नगरसेविका मीना सोंडे, माजी नगरसेवक किशोर वनवारी आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत यांनी एकाच व्यासपीठावर ‘घरवापसी’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. मुंबईतील उत्साहाने भरलेल्या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद केवळ वाढलीच नाही, तर आगामी निवडणुकांच्या तोंडावर विकासाच्या राजकारणाला नवा वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले.