
Raj Thackeray : महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय बंधनकारक करण्यावरुन सध्या रान पेटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलनही केलं. पण आता भाजपकडं त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज ठाकरेंनी हा विषय समजून घ्यावा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.