
मुंबई : अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जात होतं, आता हे प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास मनसैनिक आणि शिवसैनिकामध्ये दिसून येत आहे. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह येथे आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान मुलुंड मध्ये 'ठाकरेबंधू मनोमिलन'चे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे मुलुंडकरामध्ये चर्चा रंगली आहे.