Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन! मुंबई-पुण्यात कोसळणार मुसळधार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain: भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. आठवडाभर राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.