
मुसळधार पावसाने मंगळवारी मुंबईकरांचे हाल केले. मध्य रेल्वेची उपनगरी सेवा दुपारपासून ठप्प पडल्याने लाखो प्रवासी अडकले. अचानक विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळपासूनच लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत होत्या.