कसाबला पकडणाऱ्या 'तुकाराम ओंबळेंना' पदोन्नती.. गृहमंत्र्यांची माहिती 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८, भारताच्या इतिहासातला काळा दिवस. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यात पोलिसांनीही प्राणांची बाजी लावून लोकांचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं. आता राज्य सरकारनं यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचं जाहीर केलं आहे. यात कसाबला जीवंत पकडणारे शहिद तुकाराम ओंबळे यांनाही मरणोत्तर पदोन्नती मिळणार आहे. 

हेही वाचा: 'कोरोना'मुळे जग कोमात , भोजपुरी गाणी जोमात.. 

शहिद तुकाराम ओंबळे यांनी मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब याला जीवंत पकडलं होतं. मात्र यात त्यांना वीरमरण आलं होतं. त्यांच्यासोबत इतर १४ पोलिस अधिकारीही होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना शौर्यपदकानं गौरवण्यात आलं होतं. मात्र आता या १४ पोलिस अधिकाऱ्यांना आणि अमंलदारांना राज्य शासन एक टप्पा पदोन्नती देणार आहे. यात शहिद तुकाराम ओंबळे यांचंही नाव आहे. त्यांना राज्य शासन मरणोत्तर पदोन्नती देणार आहे. यासंबंधीची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  

हेही वाचा: कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चीनी नागरिकांची शोधमोहीम..  

कोण होते तुकाराम ओंबळे:

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेराय हॉटेल आणि ताज हॉटेल या जागांवर प्रचंड गोळीबार केला. यात भरपूर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजमल कसाबही या दहशतवाद्यांमद्धे होता. कसाब टॅक्सीमधून जात असताना तुकाराम ओंबळे यांनी या टॅक्सीला अडवलं आणि कसाबला पकडलं. मात्र कसाबनं ओंबळे यांच्यावर गोळीबार केला. स्वत:वर गोळीबार होऊनही तुकाराम ओंबळे यांनी कसाबला सोडलं नाही. त्यांना या हल्ल्यात वीरमरण आलं मात्र कसाब त्यांच्यामुळे पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या या शौर्यामुळे त्यांना 'अशोक चक्र' प्रदान करण्यात आलं होतं.

state government will give increment to police officers including Tukaram ombale   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government will give increment to police officers including Tukaram ombale