esakal | Lockdown4.0 ची नियमावली झाली जाहीर, वाचा रेड झोनमध्ये काय होणार सुरु...
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown4.0 ची नियमावली झाली जाहीर, वाचा रेड झोनमध्ये काय होणार सुरु...

२२ मे पासून लागू होणार नवीन नियमावली..  

Lockdown4.0 ची नियमावली झाली जाहीर, वाचा रेड झोनमध्ये काय होणार सुरु...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झालाय. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना आपापल्या राज्यात कसे नियम असतील याबाबत निर्णय घेण्याच्या काही मुभा दिल्या असल्याचं  समजतंय. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. खरंतर कालच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील चौथा लॉकडाऊन कसा असेल याबाबत बोलतील असं वाटत होतं. याच पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष आहे महाराष्ट्रातील चौथ्या लॉक डाऊनच्या नियमावलीवर. 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकवर पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उप मुख्यमंत्री अजीत पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील चौथ्या लॉकडाऊनमधील उपाय योजनांनसंदर्भात महत्वाची चर्चा झाली. ग्रीन, आँरेंज आणि रेड झोन मधील नागरिकांसाठी आणखी काय शिथिलता आणता येईल तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला गेला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

संपूर्ण महाराष्ट्रात काय राहणार बंद : 

 • सर्व प्रकारची आंतराराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा बंद राहील, यामधून मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर ऍम्ब्युलन्स यांना वगळण्यात आलंय. 
 • सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस 
 • मेट्रो सेवा बंद राहील 
 • हॉटेल्स, खानावळी बंद राहतील. यामधून अत्यावश्यक सेवांसाठी म्हणजे पोलिस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, गव्हर्मेंट कर्मचारी, सामान्य माणसं जे सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत अशा सर्वांसाठी, रेल्वे आणि बस डेपोमध्ये असलेल्या किचन्सला वगळण्यात आलंय.        
 • सिनेमा हॉल्स, मॉल्स, जिम, स्विमिंग पूल, नाट्यगृह, बगीचे बंद राहतील 
 • राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंदच राहतील     

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

याव्यतिरिक्त महाराष्ट्रात संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू असेल. वृद्ध, गरोदर महिला, लहान मुलं, हृदयविकार किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा नाही 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात २२ मे पासून लॉक डाऊनची नवीन नियमावली लागू होणार आहे. नवीन नियमावलीप्रमाणे राज्यात केवळ केवळ २ झोन असणार आहेत. यापैक एक रेड झोन आणि दुसरा नॉन रेड झोन असणार आहे.   

आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...

रेड झोनमध्ये काय सुरु होणार ? 

 • अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरु राहतील 
 • होम डिलेव्हरी देणारी मद्याची दुकानं सुरु ठेवण्यास परवागी 
 • केवळ पावसाळ्याआधीच्या साफसफाईसाठी रेड झोनमधील मॉल्स, दुकानं आणि उद्योगधंद्यांना सकाळी ९ ते ५ या वेळेत परवानगी देण्यात आलीये. 
 • ईकॉमर्स साईटवरून मागवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक आणि अनावश्यक गोष्टी 
 • केवळ जेवणाची होम डिलेव्हरी देणारे किचन्स आणि खानावळी 
 • RTO कार्यालयं सुरु ठेवण्यास परवानगी 

रिक्षा आणि टॅक्सी सर्व्हिस या रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी कारचा वापर करणाऱ्यासाठी १+२ अशी आणि दुचाकीचा वापर करणाऱ्यांसाठी १+० अशी परवानगी असेल.  

maharashtra state government issued new guidelines for lockdown four